Ad will apear here
Next
‘‘पीएमआरडीए’च्या माध्यमातून शाश्वत विकासाचे नियोजन’
पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांची माहिती

पुणे : ‘पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या माध्यमातून (पीएमआरडीए) या परिसराच्या शाश्‍वत विकासाचे नियोजन करण्यात आले आहे. या भागातील नागरिकांना दर्जेदार पायाभूत नागरी सुविधा देण्यावर भर दिला आहे. ‘रिंगरोड’, ‘मेट्रो’, ‘टीपी स्कीम’ या प्रकल्पांमुळे महानगर क्षेत्राच्या विकासाचा वेग वाढणार आहे,’ अशी माहिती महसूल, सार्वजनिक बांधकाममंत्री तथा पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली. 

‘पीएमआरडीए’ बैठक आज (पाच जुलै) पालकमंत्री पाटील यांच्या अध्यक्षतेखाली आकुर्डी येथील प्राधिकरणाच्या कार्यालयात झाली. त्या वेळी ते बोलत होते. या वेळी पिंपरी-चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणाचे अध्यक्ष सदाशिव खाडे, राज्यस्तरीय लेखा समितीचे अध्यक्ष सचिन पटवर्धन, साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे विकास महामंडळाचे अध्यक्ष अमित गोरखे, आमदार महेश लांडगे, आमदार लक्ष्मण जगताप, आमदार बाबुराव पाचरणे, जिल्हाधिकारी नवलकिशोर राम, पिंपरी-चिंचवड महापालिकेचे आयुक्त श्रावण हर्डीकर, ‘पीएमआरडीए’चे महानगर आयुक्त विक्रम कुमार, पिंपरी-चिंचवड नवनगर प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रमोद यादव आदी उपस्थित होते.

पाटील म्हणाले, ‘पुणे मेट्रोसोबतच, वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी ‘पीएमआरडीए’ने ‘रिंगरोड’चे काम हाती घेतले आहे. मुंबई आणि पुणे महानगर यामधील प्रवासासाठी लागणारा वेळ ‘हायपर लूप’ या आधुनिक वाहतूक व्यवस्थेमुळे कमी होणार आहे. या प्रकल्पांची कामे विहित कालावधीत पूर्ण करणे आवश्यक आहे.’

यावेळी पीएमआरडीएच्या माध्यमातून सुरू असलेली विविध विकासकामे व प्रकल्पाबाबत ‘पीएमआरडीए’चे महानगर आयुक्त विक्रम कुमार यांनी माहिती दिली.  
 
पिंपरी-चिंचवड नवनगर विकास प्राधिकरण कामकाजाही आढावा
पिंपरी-चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणाच्या कामकाजाबाबत आकुर्डी येथे झालेल्या बैठकीत पाटील यांनी नवनगर उभारणीसाठी जमीन संपादन, संपादित केलेल्या जमिनीचा नियोजनबद्ध व सर्वांगीण विकासाबाबत सविस्तर चर्चा केली.

पिंपरी-चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणाच्या माध्यमातून सुरू असलेल्या कामाबाबत अध्यक्ष खाडे यांनी, तर प्रकल्पांच्या स्थितीबाबत मुख्य कार्यकारी अधिकारी यादव यांनी सविस्तर माहिती दिली. प्राधिकरणाच्या माध्यमातून सुरू असलेल्या कामाबाबत पालकमंत्री पाटील यांनी समाधान व्यक्त केले.
 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/ZZWCCC
Similar Posts
‘आधारकार्ड अभियाना’ची मोहिम महिनाभर वाढविण्याची मागणी पिंपरी : महापालिकेतर्फे सर्व क्षेत्रीय कार्यालयात दोन दिवसीय ‘आधार नोंदणी व दुरुस्ती विशेष अभियान’ राबविण्यात आले होते.  नागरिकांच्या सोईसाठी ही मुदत महिनाभर वाढविण्यात यावी, अशी मागणी स्थायी समिती सदस्य तथा नगरसेवक प्रा. उत्तम केंदळे यांनी केली आहे.  या संदर्भात पुण्याचे जिल्हाधिकारी सौरव
सात लाख पुणेकर होणार आगीपासून सुरक्षित पुणे : राष्ट्रीय अग्नी सेवा सप्ताहानिमित्त पुणे महानगरपालिका (पीएमसी) आणि पिंपरी-चिंचवड महानगरपालिका (पीसीएमसी) यांचे अग्निशामक विभाग आणि जागतिक पातळीवर विना नफा तत्वावर चालवल्या जाणाऱ्या सेफ किड्स फाउंडेशनने संयुक्तरीत्या शहरभरात आगीपासून सुरक्षित राहण्याबाबत जागृती कार्यक्रम राबवण्याचा निर्णय घेतला
पिंपरी येथे आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त योगाभ्यास सत्र पिंपरी : येथील डॉ. डी. वाय. पाटील आयुर्वेद महाविद्यालय व संशोधन केंद्रात स्वस्थवृत्त व योग विभागातर्फे २१ जून २०१९ रोजी जागतिक योगदिन साजरा केला जाणार आहे. सकाळी सात ते नऊ या वेळेत आयुर्वेद महाविद्यालयाच्या प्रागंणात आयोजित योगाभ्यास सत्राला पिंपरी-चिंचवडचे महापौर राहुल जाधव उपस्थित राहून योगाभ्यास करणार आहेत
पुण्यात ‘युनिक जेम्स अँड ज्वेलरी इंटरनॅशनल शो’ पुणे : ‘पुणे शहराला ‘ज्वेलरी हब’ बनविण्याबरोबरच सराफ व व्यापाऱ्यांना एक हक्काचे व्यासपीठ उपलब्ध व्हावे या उद्देशाने स्टायलस इव्हेंट्स इंडिया, महाराष्ट्र राज्य सराफ सुवर्णकार फेडरेशन आणि पुणे सराफ असोसिएशन यांच्यातर्फे चौथ्या ‘युनिक जेम्स अँड ज्वेलरी इंटरनॅशनल शो– २०१८’ या आगळ्यावेगळ्या प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language